एखादा उमेदवार मग तो फ्रेशर असो वा अनुभवी, त्याची सर्व माहिती जसे शिक्षण, वय, सध्याचा रहिवास, कायमचा रहिवास, पगाराची अपेक्षा, सध्याचा पगार, कामाचा अनुभव, त्याला नेमक्या कुठल्या क्षेत्रात नौकरी हवी आहे, नौकरी कुठे हवी आहे, कॉम्प्युटर आणि टायपिंग बद्दलचे ज्ञान, इत्यादी बद्दल सगळी माहिती योग्यरीत्या संग्रहित करणे म्हणजेच "एम्प्लॉई रेकॉर्ड डिजिटायझेशन" ("Employee Record Digitization").


Power To Empower

जयपुष्प ग्रुपद्वारे 300 HR/रिक्रुटर लोकांच्या केलेल्या सर्व्हे मध्ये असे समजले की जवळ सर्वच


HR लोकांना रिक्रुटमेंट करतांना पुढील अडचणी येतात :

उमेदवारांचा कुठलाही सेण्टरलाईझ डाटाबेस (Centralize Database)नसणे.

नौकरीच्या ओपनिंग्स असतानादेखील योग्य उमेदवार वेळेत न मिळणे.

जुना उमेदवार सोडून गेल्यास प्रत्येक वेळी नव्याने उमेदवाराचा शोध घ्यावा लागणे.


HR लोकांप्रमाणेच उमेदवारांना नौकरी शोधताना पुढील अडचणी येतात :

सोशल मीडियाद्वारे एखाद्या कंपनीत ओपनिंग्स असल्याची माहिती मिळाल्यास तो मेसेज खरा की खोटा हे तपासता येत नाही.

मेसेज खरा असून आपण गेलो नाही तर आपली नौकरीची संधी जाते. आणि जर मेसेज खोटा निघाला तर आपला वेळ,पैसे, प्रवास खर्च, ऑफिसला घेतलेली सुट्टी सर्व वाया जाते.

मेसेज खरा असला तरीपण उमेदवारांना प्रत्येक वेळेस इंटरव्हिव करिता कंपनीच्या पुणे, मुंबई किंवा संबंधित कंपनी ऑफिसला लगेच जाणे शक्य नसते.

बऱ्याचदा कंपनीच्या नावाखाली एजंट लोकच फसवी ऍड देतात आणि त्यांच्या ऑफिसला बोलावून रेजिस्ट्रेशन करायला भाग पाडतात.

प्रत्येक कंपनीचे इंटरव्हिव हे वेगवेगळ्या दिवशी असतात आणि म्हणून शहरात भाड्याने रूम घेऊन नौकरी शोधणे हे आर्थिकदृष्ट्या महागात पडते.


HR/रिक्रुटर लोक योग्य उमेदवाराच्या शोधात असतात, तर उमेदवार हे नौकरीच्या शोधात असतात आणि या दोघांमधली तफावत भरून काढण्यासाठी "रेकॉर्ड डिजिटायझेशन"ची गरज आहे.

HR/रिक्रुटर आणि उमेदवारांच्या आधुनिक समस्या ह्या आधुनिक पद्धतीनेच सोडवता येतात.


उमेदवाराची माहिती ही एका इंटरव्हिवद्वारे शेकडो कंपन्यानपर्यंत पोहोचविता येते.

नौकरी मिळवण्याचे प्रमाण वाढवता येते कारण उमेदवाराची माहिती ही कंपनी HR कडे वर्षभर असते.

उमेदवारांचे रेझ्युम हे सरळ HR रिक्रुटर कडे असतात आणि कंपनी गेटवर सेक्युरिटी किंवा इतर कोणाकडे पडून नसतात.

उमेदवारांचा प्रिंटेड रेझूम हे HR कडे धूळ खात बसतात तर याउलट "डिजिटाइझड रेकॉर्ड" हे संपूर्ण वर्षभर कंपनी HR कडे ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध असतात.

तुमचा "वन लाईन रेझ्युम" तुम्ही कुणालाही शेअर करू शकता. (www.jaipushpa.com/mobile)

प्लेसमेंट कन्सल्टंटकडे रजिस्ट्रेशन फी भरायची गरज नाही.

अनलिमिटेड कॉल्स आणि तेही सरळ कम्पनीकडून - कुठल्याही एजंट आणि कुठल्याही कमिशन शिवाय.

दर दिवशी नवनवीन कंपन्याची नोंद होत असते आणि लवकरच दहा हजार कंपन्या सहभागी करणार आहे.

10,000 + अधिक कंपन्यांकडे अर्ज करा, आपल्या मोबाईलवरुन - अगदी मोफत.


उमेदवारांची सर्व माहिती घ्यायला/रेकॉर्ड डिजिटाईझ करायला आम्ही येत आहोत महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात.

तेव्हा आजच रेजिस्ट्रेशन करा. रेकॉर्ड डिजिटायझेशन आणि पुढील सर्व प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे.


रेजिस्ट्रेशन आवश्यक (Compulsory) - अन्यथा रोजगार मेळाव्यास प्रवेश नाही.
तुमच्या अधिकाधिक मित्र मैत्रिणीनं पर्यंत ही Website Share करा.
Note: रेकॉर्ड डिजिटायझेशन, वन लाईन रिझ्युम आणि सर्व कंपन्यांकडे अर्ज करता येणे ह्या गोष्टी पूर्ण पणे मोफत असून कुठलेही चार्जेस नाही [CSR Programme].